Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane For Female ; नमस्कार मित्रांनो! या लेखात, आम्ही तुम्हाला तुमच्या लग्नात मदत करण्यासाठी 99+ उखाणे नमूद करू. हे उखाणे वाचा आणि तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना नक्की शेअर करा.

चला सुरू करुया!

Marathi Ukhane For Female

गणपतीच्या शिरावर हिरामानिकाचे छत्र _ रावांच्या नावाचे घालते मंगळसूत्र. तुळशीचे वृंदावन आहे पावित्र्याचे स्थान रावांनी दिला मला सुवासिनीचा मान.

सुरुवात करते दिवसाची जोडून सूर्य नारायणाला हात रावांची लाभो जन्मो जन्मीची साथ. लग्नाच्या पंक्तीत घेतले नाव खास रावांच्या घशात अडकला घास.

तेलाच्या दिव्याला कापसाची वात रावांशी लग्न केले लागली आयुष्याची वाट. कोकणातून आणले फणस आणि काजू रावांना शिव्या घालायला मी कशाला लाजू.

नाव घे नाव घे उखाणा काही सुचत नाही आणि नाव कोणा कोणाच घेऊ मला काही कळत नाही.

वांग्याचा केला रस्सा, फिश केला फ्राय भावच देत नाय किती केल ट्राय. एकत्र काम केलं तर काम होईल लवकर, मी करते भाजी आणि तू लाव कुकर. चांदीच्या ताटात सातारी कंदी पेढे राव तेवढे हुशार बाकी सगळे वेडे.

पुरण पोळी ला तूप लावते साजूक राव आमचे खूपच नाजूक. एक होता माऊ, एक होती चिऊ _ चे नाव घेतले आता डोक नका खाऊ.

आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा,………… चा व माझा संसार आहे सुखाचा.

भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी,……….चं नाव घेते ………. दिवशी.

भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता,………… नाव घेते सर्वांच्याकरिता.

संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,……च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.

ग़जाननाच्या मन्दिरात संगीताची गोडी,

सुखी ठेवा गजानना सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,………….ची जोडी.

गणेशा च्या पूजनाने उद्याची होईल सुरुवात..

गणेशाला स्मरून करू विघ्नावर मात,

……… रावांची साथ लाभली,

सून बनून आले मी ह्या घरात.

तु्ळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद,

माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात,

….रावांचे नाव घेउन करते संसाराला सूरूवात.

अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात,

भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रुप,

रुपसारखा जोडा,

,……चे नाव घेते वाट माझी सोडा.

आई वडिलांनी केले संस्कार,

शिक्षणाने केले सक्षम,

……… सोबत असताना,

संसाराचा पाया होईल भक्कम.

Ukhane in Marathi for Female Marriage

….रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा
कारण त्यांचा बाप आहे मोठा….होऊ दे तोटा.

Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले
….राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले.

आघाडीत बिघाडी युतीत चाललये कुस्ती
….रावांची कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे वस्ती.

आज आहे शनिवार उद्या येईल रविवार
….रावांशी करते संसार, घडवू सुखाचा परिवार.

खोक्यात खोका टिवी चा खोका,
….माझी मांजर आणि मी तिचा बोका.

कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…. राव माझे आहेत फार निस्वार्थी.

गोड करंजी सपक शेवाई ….
होते समजूतदार म्हणून….करून घेतले जावई.

बागेत बाग राणीचा बाग….
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!.

लग्नासाठी मराठी उखाणे
चांदीच्या ताटात फणसाचे गरे
….राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे.

आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची….म्हणजे जगदंबा.

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
…. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ….
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी .

पाव शेर रवा पाव शेर खवा
….चे नाव घेते हजार रुपये ठेवा..

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.

ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
….ला पाहून माझ डोक दुखत..

ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड
…. रावांना भरवते Ice cream चा घास सांगा आहे कि नाही थंड?.

लग्नासाठी मराठी उखाणे

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
….रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव!.

डाळित डाळ तुरीची डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ.

….रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत!.

सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
….रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!.

पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
….चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर.

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.

Ukhane Marathi Funny

मंदिरात वाहाते, फुल आणि पान, … रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, … रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, .. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, .. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, … रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, … रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे, … रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, … रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात.

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, …रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, … रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, … रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, … रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, … रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.

लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, …रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, … रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, … रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन.

श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष, … रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, … रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली.

अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा, … रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा.

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, … रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे, … राव हेच माझे अलंकार खरे.

पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा, … रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान, … रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला, … रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला.

श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन, … रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, … रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, … रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

Marathi Ukhane for Husband

……. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल
तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
……. चे नाव घेतो ऐका देऊन कान.

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी
माझी ……. म्हणते मधुर गाणी.

श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा
आमच्या …… ला आवडतो गरमगरम बटाटेवडा.

पाच बोटातून होते कलेची निर्मिती
……. वर जडली माझी प्रीती.

खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन
आमच्या ……… चं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली
तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.

वादळ आलं पाऊस आला मग आला पूर
……. चं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.

केसर दुथात टाकलं काजू बदाम जायफळ
…….. चं नाव घेतो, वेळ न घालवता वायफळ.

तू पुण्याची मिसळ मी मुंबईचा वडापाव
लग्नाला हो म्हणायला ……..ने खाल्ला जास्तच भाव.

चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली
पण ……….कडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.

अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम
…….. चं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.

काट्यात काटा गुलाबाचा काटा
…….. चं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा
……… ला घास भरवतो वरणभात तूपाचा.

आंबा गोड ऊस गोड त्याहीपेक्षा अमृत गोड
……..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
……… चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

हा दिवस आहे आमच्याकरिता खास
……… ला देतो गुलाबजामचा घास.

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा
शोधून सापडणार नाही …….सारखा हिरा.

निष्कर्ष

Marathi Ukhane For Female

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे मराठी उखाणे महिलांसाठी आवडले असेल.
तुम्हाला तुमचे विचार आणि भावना सोशल मीडियावर व्यक्त करायच्या असतील तर सोशल मीडियावर तुमची अभिव्यक्ती दाखवण्यासाठी या स्टेटसचा वापर करा.
त्यामुळे पुरुषांसाठीचे हे मराठी उखाणे तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत व्हाट्सएप आणि फेसबुकवर शेअर करायला विसरू नका.
जर तुमच्याकडे आमच्यासाठी काही सूचना असतील तर खाली टिप्पणी करा आणि अधिक चांगल्या सुधारण्यासाठी मला तुमचा मौल्यवान अभिप्राय द्या.

Read: माझी शाळा मराठी निबंध | My School Essay In Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.